बुटीबोरी : ब्राह्मणीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस समर्थित गटाच्या सरपंच पदाच्या उमेदवार मनीषा अरुण थुलकर या भरघोस मतांनी विजयी झाल्या. बोरखेडी (रेल्वे) पं. स. सर्कल अंतर्गत ब्राह्मणी ग्रा.पं.ची निवडणूक असल्यामुळे माजी पं.स. उपसभापती व विद्यमान पं.स.सदस्य संजय चिकटे यांच्या प्रतिष्ठेचा विषय होता.
त्यामुळे त्यांनी योग्य ध्येय धोरणे, नियोजन, उत्तम संघटन व प्रचाराच्या झंझावतात विरोधी पक्षाचे पाणीपत करीत सरपंच मनीषा थुलकरसह नरेश दहे, सुनीता खैरे, संघर्ष दुपट्टे, ललिता कुमरे, नितेश उरकुडे, अस्मिता दिवे व जयश्री बागडे या सर्वच्या सर्व उमेदवारांना विजयश्री मिळवून दिली.
त्यामुळे विजयाचा जल्लोष व विजयी उमेदवारांचे स्वागत त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात करण्यात आले होते. यावेळी दीपचंद कांबळे, प्रकाश हांडे, कमलेश मुन, हरीश फंड, किशोर धुर्वे, राजेंद्र जीवतोडे, प्रशांत देवळे, सूरज नगराळे, चरण काळे, दिलीप फंड, प्रकाश उपरे, इंद्रजित लोंढे आदी उपस्थित होते.