बुटीबोरी :- बुटीबोरी नगरीतील श्री तिरुपती बहुउद्देशीय संस्था द्वारा संचालीत बालाजी कॉन्व्हेंट तथा ज्युनिअर कॉलेजला २५ वर्ष पूर्ण होत असल्याकारणाने रौप्यमहोत्सव हजारो विद्यार्थी व पालकांच्या उपस्थितीत मोठ्या थाटामाटात पार पडला.
दिनांक ०४ जनवरी ते १० जानेवारी दरम्यान साजरा करण्यात येणाऱ्या या रौप्यमहोत्सवची सुरुवात ४ तारखेला विज्ञान प्रदर्शनीने करण्यात आली.विध्यार्थ्यांनी नेत्रदीपक विज्ञानाचे विविध मॉडेल्स तयार करून उपस्थितांचे लक्ष वेधले.तर ५ तारखेला आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यात विविध प्रकारचे आणि विविध राज्यातील प्रसिद्ध फूड विध्यार्थीनी ठेवले होते.

७ जानेवारी पासून शाळेच्या सांस्कृतिक कार्यक्रमाची रंगारंग सुरुवात प्री प्रायमरीच्या छोट्या छोट्या चिमुकल्या पासून करण्यात आली.या सांस्कृतिक या कार्यक्रमात नर्सरी ते ज्युनियर कॉलेजच्या शेकडो विध्यार्थ्यांनी भाग घेतला.
यात जुन्या नव्या गाण्याचा मेळ,भक्तीगीत,शिवतांडव त्याचबरोबर सामाजिक संदेश देणारे नृत्य तथा नाटकांचे प्रदर्शन विध्यार्थ्यांनी केले.रात्री प्रकाशझोतात चाललेल्या या कार्यक्रमाला विद्यार्थी, पालक व शिक्षकांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला.याच दरम्यान विविध खेळांचे सुद्धा आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे समीर मेघे आमदार (हिंगणा),राजेंद्र चिखलखुंदे (मुख्याधिकारी न.प.बुटीबोरी) बबलू गौतम (माजी नगराध्यक्ष),मुजीब पठाण,अविनाश गुर्जर,आकाश वानखेडे,मुन्ना जैस्वाल, नामदेव मोरे (प्राचार्य नवभारत विद्यालय गोंडखैरी),मंदार वानखेडे,सन्नी चौहान,तुषार डेरकर,शाशिन अग्रवाल,राजबलसिंह चौहान,मुरली पनपालिया, दिवे सर,तसेच सर्व माजी नगरसेवक,गावातील प्रतिष्ठित व्यक्ती,पोलीस स्टेशन येथील अधिकारी रमेश नागरे,कुमुदिनी पथोडे मॅडम,तसेच परिसरातील सर्व सामाजिक कार्यकर्ते,पत्रकार यांची उपस्थिती होती.शाळेच्या वतीने सर्वांचा शाल श्रीफळ व सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
आगळ्या वेगळ्या चाललेल्या उपक्रमाचे आयोजन करिता डॉ.प्रकाश नेउलकर संचालक (बालाजी कॉन्व्हेन्ट),सौ.अर्चना प्रकाश नेऊलकर (संस्था उपाध्यक्षा),हेमंत वाडीकर (सेवानिवृत्त अप्पर सचिव मंत्रालय मुंबई) प्रथमेश नेऊलकर (संस्था सह सचिव),अथर्व नेऊलकर (संस्था कोषाध्यक्ष) यांच्या सह शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षकांनी घेतलेली मेहनत खरंच पाहण्याजोगी होती.या सर्वांच्या परिश्रमाने या इतक्या मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन यशस्वीपणे पार पडले.
शनिवार ११ तारखेला सरस्वती मातेचे पूजन करून विध्यार्थ्यांनकरिता स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले.कार्यक्रमाचे आयोजन व कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे संस्था चालकांनी आभार मानले.

कोट
डॉ.प्रकाश नेऊलकर (संस्थापक बालाजी कॉन्व्हेन्ट)
सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्याचा अंगी असणाऱ्या सुप्त गुणांना चालना मिळावी, बाल वयात त्यांच्या तील अनेक कला गुण विकसित व्हावेत या एकमेव उद्देशाने या रौप्यमहोत्सवाच्या माध्यमातून चार दिवसीय सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.