बाबूजी धीरे चलना, धोके हैं इस राह में

कोलार रोड रेल्वे क्रॉसिंगची दयनीय अवस्था, कोलार रेल्वे फाटकाजवळ चिखलाचे साम्राज्य

बुटीबोरी, गेल्या कित्येक वर्षांपासून उमरेड रोडवरील रेल्वे क्रॉसिंगची दयनिय अवस्था नागरिकांची मोठी समस्या होत आहे. रेल्वे क्रॉसिंगजवळील उड्डाण पुलाचे काम २०१९ पासून संथ गतीने चालू आहे. कित्येक वर्ष होऊनही या रस्त्याची अवस्था ‘जैसे थे’च आहे. कोलार रस्ता हा रोड उमरेड वाहतुकीसाठी खूप महत्वाचा आहे.

बुटीबोरीला ग्रामीण भागाशी जोडणारा हा रस्ता आहे आणि विशेष बाब म्हणजे ही की सर्वात जास्त वर्दळांचा मार्ग आहे. उड्डाणपुलाचे काम चालू असताना सर्व्हिस रोडचेसुद्धा काम झालेले नाही. हा रोड पावसाळ्यात जीवघेणा ठरतो. सायकलने जाणारे शाळेतील मुले, दुचाकी चालक व व इतर करणाऱ्या नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो. सध्या मुख्य रस्त्यावर अनेक मोठमोठे खड्डे असून व आजूबाजूला मातीची ढीगारे आहेत.

पावसामुळे या रस्त्यावर खोलवर चिखल झाला असून त्यामुळे इथून जाणान्यांच्या अपघातांच्या संख्येमध्ये वाढ होत आहे.
यावर उड्डाणपुलाचे काम होईपर्यंत तात्काळ पर्यायी मार्ग काढण्यात यावा, अन्यथा गंभीर विषयावर त्वरित या उपाययोजना न झाल्यास मोठ्या प्रकारची दुर्घटना होण्याचा धोका संभवतो आहे. त्यामुळे लवकरात लवकर या तो काढावा अशी मागणी कोलारमधील रहवासी समीर ठाकरे, प्रवीण भोयर, अतुल गावंडे, मनोज ठाकरे, संजय आंबुलकर, चंद्रशेखर शहाणे, निलेश ठाकरे व गणेश ठाकरे यांनी केली आहे.

” दूरवर्षी कोलारवासींना पावसाळ्याच्या दिवसात या रस्त्यामुळे मोठ्या प्रमाणात त्रास सोसावा लागतो. प्रशासनकडून या समस्येवर दरवर्षीप्रमाणे यंदाही कोणताही तोडगा निघाला नाही. नागरिकांनी कितीतरी वेळा तक्रार केली. पण कोणाचेच लक्ष नाही. प्रशासनाने लक्ष देऊन सर्व्हिस रोडचे काम लवकर करावे. अन्यथा या रस्त्यावर अपघात होण्याचे प्रमाण वाढण्यास वेळ लागणार नाही. -समीर ठाकरे, कोलारवासी

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *