ज्ञानदीप शाळेचे वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात साजरा

विध्यार्थ्यांच्या सुप्त गुणांनसह त्यांना संस्कार आणि संस्कृतीची ओळख देणे गरजेचे – विनोद लोहकरे

बबलु गौतम यांनी केले विद्यार्थ्यासह शालेय प्रशासनाचे कौतुक.

बुटीबोरी :-विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता वार्षिक स्नेहसंमेलन आवश्यक असून यामुळे विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या सुप्त कला गुणांना वाव मिळतो.विद्यार्थात स्टेज डेअरिंग सह त्यांच्या शारीरिक व बौद्धिक विकास होण्याकरिता उपयुक्त ठरते.आज घडीला धकाधकीच्या जीवणामुळे आई वडील आपल्या पाल्याकडे विशेष लक्ष देऊ शकत नसल्यामुळे विध्यार्थ्यांना शिक्षणासह संस्कारीत करून त्यांना आपल्या संस्कृतीची ओळख करून देणे ही शिक्षकाची जवाबदारी असल्याचे मत प्रियदर्शनी व ज्ञानदीप शिक्षण संस्था संस्थापक अध्यक्ष विनोद लोहकरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना व्यक्त केले.


औद्योगिक परिसर,सिडको कॉलनी,सातगांव येथील ज्ञानदीप कॉन्व्हेंट व उच्च प्राथमिक शाळा येथे दरवर्षी प्रमाणे यंदा ही वार्षिक स्नेह संमेलनचे आयोजन करण्यात आले होते.दिनांक २१ जानेवारी ची सायंकाळ शाळेतील चिमुकल्या करिता अत्यंत आनंद देणारी ठरली.
२१ जानेवारी शाळेच्या सांस्कृतिक कार्यक्रमाची रंगारंग सुरुवात प्री प्रायमरीच्या छोट्या छोट्या चिमुकल्या पासून करण्यात आली.या सांस्कृतिक कार्यक्रमात नर्सरी ते दहावीच्या शेकडो विध्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.यात जुन्या नव्या गाण्याचा मेळ,भक्तीगीत,शिवतांडव त्याचबरोबर सामाजिक संदेश देणारे नृत्य तथा नाटकांचे प्रदर्शन विध्यार्थ्यांनी केले.रात्री प्रकाश झोतात चाललेल्या या कार्यक्रमाला विद्यार्थी,पालक व शिक्षकांनी सुद्धा हिरीहीरीने सहभागी होत आपल्या विध्यार्थी व पाल्यांचा आनंद द्विगुणित केला.


कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे शाळेतील शिक्षक मनोज ठाकरे यांनी तब्बल २०१ प्रश्नांची मालिका तयार केली ज्यांची अचूक उत्तरे ५ मिनिटात वर्ग ४ थी मधील आयुष भोयर व ६ वी मधील शौर्य शेलकर या दोन विद्यार्थ्यानी दिली.विद्यार्थ्यांचे प्रोत्साहन वाढविण्याकरिता नगराध्यक्ष बबलु गौतम यांनी दोघांना दोन लॅपटॉप देण्याची घोषणा केली तर मुख्याधिकारी राजेन्द्र चिखलखुंदे यांनी १० हजार रुपयाचे रोख बक्षीस चिमुकल्याना दिले.


स्नेहसंमेलन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून राजेंद्र चिखलखुंदे बुटीबोरी न.प.मुख्यधिकारी,बबलू गौतम माजी नगराध्यक्ष,अविनाश गुर्जर उपाध्यक्ष व बांधकाम सभापती,आतिश उमरे विरोधी पक्ष नेता,जि.प.नागपूर,योगेश सातपुते सातगाव सरपंच,सिध्देश्वर काळुसे शिक्षणाधिकारी (प्राथ.) सचिन चौधरी (मॅनेजिंग डायरेक्टर लासेनर इंडिया प्रा.लि.कंपनी)सन्नी चौहान,प्रशांत डाहुले,सतीश जयस्वाल आदी प्रामुख्याने उपस्थित होते.यावेळी संस्थेकडून विनोद लोहकरे यांनी गावातील प्रतिष्ठित नागरिक,अधिकारी व पत्रकारांचा शाळेच्या वतीने शाल,श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.


या यशस्वीतेकारिता विनोद लोहकरे (शाळेचे संचालक,संस्था अध्यक्ष )सौ.उज्वलाताई लोहकरे(मुख्याध्यापिका खापर्डे विद्यालय व सचिव ज्ञानदीप) शिक्षण संस्था,अव्दैत लोहकरे (व्यवस्थापकीय संचालक)वेदनारायण मोरवाल (मुख्याध्यापक मराठी माध्यम) वंदना पानबुडे (मुख्याध्यापिका इंग्रजी माध्यम) देवेन्द्र ठाकरे,प्रदिप तेलरांधे,रोशनी बुरकुंडे मनोज ठाकरे,रामनाथ चौवान सर,विद्यार्थीप्रमुख,निलय वंजारी,पल्लवी येरपुडे,साक्षी राऊत व शिक्षकांनी अत्यंत परिश्रम घेतले.
गुरुवारला सरस्वती मातेचे पूजन करून विध्यार्थ्यांनकरिता स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले.स्नेह संमेलनाच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे विनोद लोहकरे यांनी आभार मानले.

विनोद लोहकरे,संस्थापक ज्ञानदीप शिक्षण संस्था
सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्याचा अंगी असणाऱ्या सुप्त गुणांना चालना मिळावी,बाल वयात त्यांच्यातील अनेक कला गुण विकसित व्हावेत या एकमेव उद्देशाने दरवर्षी वार्षिक स्नेह संमेलनाच्या माध्यमातून सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *