बुटीबोरी. बेला पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या कवठा शिवारातील बोरखेडी ते सिंधी रेल्वे पटरीच्या पोल क्र.712 नजिक एका अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आल्याची घटना नुकतीच उघडकीस आली असून सदर अनोळखी इसम हा अंदाजे 30 ते 35 वयोगटातील आहे.

त्याची उंची साधारण 5 फुट 7 इंच, रंग निमगोरा, अंगात पांढऱ्या रंगाचे शर्ट आणि निळया रंगाचा, जिन्पॅन्ट घातलेला, डोक्यावर बारीक केस असुन उजव्या हाता वर हरीशंकर असे गोदण केलेले आहे.
बेला पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करून उत्तरीय तपासणी करिता रवाना करून

घटनेची कलम 194 बीएनएस अन्वये नोंद करण्यात आली आहे.