बोरखेडी (रेल्वे) व जंगेश्वरवासीयांना पट्टे वाटप

Butibori- गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित पट्टे वाटपाच्या प्रश्नाला सरपंच राजू घाटे यांच्या प्रयत्नमुळे अखेर यश आले. १७ एप्रिल रोजी बोरखेडी (रेल्वे) ग्रा. पं. अंतर्गत येणाऱ्या जंगेश्वर येथील गावठाण जागेवर अतिक्रमण करणाऱ्यांना नागपूर (ग्रामीण)

भूमी अभिलेख कार्यालय अधीक्षक बन व सरपंच राजू घाटे यांच्या हस्ते रितसर पट्टे वाटप करण्यात आले. बोरखेडी (रेल्वे) येथील उर्वरित अतिक्रमणधारकांनाही लवकरच पट्टे वाटप करण्यात येईल, अरी ग्वाही देण्यात आली.बऱ्याच वर्षांपासून बोरखेडी (रेल्वे) आणि जंगेश्वर येथील अतिक्रमणधारकांना पट्टे वाटपाच्या प्रश्नाने पेच पडला होता.

नागपूर (ग्रामीण) तालुक्यातील अनेक गावांमचे अतिक्रमण आहे. बोरखेडी (रेल्वे) येथे असलेले अतिक्रमणधारक हे सरपंच राजू घाटे यांच्या साततच्या पाठपुराव्यामुळे व अविरत प्रयत्नमुळे पात्र ठरले आहेत. शासन निर्णयानुसार २००० पर्यंतचे व २००० ते २०११ पर्यंतचे अतिक्रमण नियमाकुल केले

असल्यामुळे सर्व स्तरावरून केंद्र शासनाच्या या निर्णयामुळे अतिक्रमणधारकांच्या प्रतिक्षेला आता कायम विराम लागला आहे. दरम्यान पट्टे वाटप प्रसंगी ग्रा.पं. सचिव शिवाजी काकडे, अशोक मानकर, नंदकिशोर काळे, विष्णू भोजने आदी उपस्थित होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *