अखेर…..नागपूर-बोरखेडी (रेल्वे) आपली बस सेवा सुरू

प स सदस्य संजय चिकटे यांच्या प्रयत्नाला यश

चालक व वाहकांचे स्वागत,मिठाई वाटून साजरा केला आनंद उत्सव


नागपूर:- बोरखेडी (रेल्वे) व परिसरातील अनेक युवक,युवती,महिला,पुरुष व विद्यार्थी हे रोजगार व शिक्षणाच्या संदर्भाने रोज विविध ठिकाणी जात असतात.त्यांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी,शाळा,महाविद्यालयात जायला अडचणी येऊ नये व त्यांना वेळेवर पोहचता यावे म्हणून नागपूर ते बोरखेडी (रेल्वे) आपली बस ( स्टार बस) सुरू करण्यात यावी अशी मागणी नागपूर पंचायत समितीचे सदस्य व माजी उपसभापती संजय चीकटे यांनी आपली बस व्यवस्थापनाकडे सतत लावून धरली होती. त्याच अनुषंगाने दि.०९ जून पासून अखेर….

. नागपूर ते बोरखेडी (रेल्वे)आपली बस सेवा सुरु झाली.
बोरखेडी (रेल्वे) परिसरात जवळपास १०-१५ लहान लहान गावे आहेत.तेथील लोकांना कुठल्याही गावाला जायचे असल्यास बोरखेडी येथे येऊनच बसची वाट बघावी लागते.त्यातल्या त्यात या जवळपास १०-१५ गावातील शेकडो लोक रोज काहींना काही कामासाठी नागपूर ला जात असतात तसेच या परिसरातील अनेक विद्यार्थीही महाविद्यालयीन शिक्षण घेण्याकरिता तर अनेक गरजू कामगार कामाकरिता बुटीबोरी औधोगिक क्षेत्र,मिहान व नागपूर येथेच जात असतात,या सर्वांना आपापल्या कामाच्या स्थळी,शाळा,महाविद्यालयात जायला होत असलेली अडचण बघून नागपूर पंचायत समितीचे सदस्य व माजी उपसभापती संजय चीकटे यांनी आपली बस (स्टार बस) व्यवस्थापनाला दि ०७ ऑगस्ट २०२२ ला निवेदन देऊन नागपूर बोरखेडी,बोरखेडी-बुटीबोरी औधोगिक परिसर अशी बस सेवा सुरू करण्याची मागणी केली होती.व सतत याकरिता पाठपुरावा केला.याकरिता महाराष्ट्र राज्य माजी मंत्री रमेश्चंद्र बंग, नागपूर जी.प.सदस्य वृदा नागपुरे, बाजार समिती सभापती अहमद बाबू शेख व उपसभापती प्रकाश नागपुरे यांनी सुद्धा या कामात मोलाची मदत केली.

आणि अखेर या सर्वांच्या प्रयत्नाला यश येत दि ०९ जून पासून नागपूर बोरखेडी (रेल्वे)आपली बस सेवा सुरु झाली.
गावात पहिल्यांदाच स्टार बस आल्याचे बघून भारावून गेलेल्या नागरिकांनी स्टार बस चालक यांचे शाल श्रीफळ मिठाई देवून गावातील प्रतिष्ठित युवक सुनील ढोके व मित्र परिवार यांनी तर वाहक यांचे विद्यार्थी वर्गातून अमन मिलमिले व निशिकांत कळसकर यांनी स्वागत केले.यावेळी प्रामुख्याने पंकज मून,गजानन गाऊत्रे,किशोर धूर्वे,राजेंद्र जिवतोडे,प्रकाश उपरे,दिलीप फंड,हरीश फंड,चंद्रमणी माटे,प्रशांत देवळे,प्रशांत रावळे,चरण काळे,किशोर काकडे,फिरोज पवार,सावळा लस्करे,अंकुश काळे,गौरव काकडे,खंदुजी भोयर,मयूर गिरी,शंकर मडावी,सुनील हांडे,अमन मिलमिले,निशिकांत कळसकर,दिवेश ढोके,सदलिमामा धुर्वे,अजय देशमुख,सूरज नगराळे,कमलेश मून,दिपचंद कांबळे,हनुमान झकनेकर,रवींद्र निखाडे आदी गावकरी उपस्थित होते.समस्थ ग्रामस्थांनी माजी उपसभापती संजय चिकटे व आपली बस व्यवस्थापकांचे आभार व्यक्त केले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *