बुटीचोरी परिसरातील राष्ट्रीय महामार्गावरील वाढते अपघात आणि अवैध प्रवासी वाहतुकीबद्दल होत असलेल्या तक्रारीवरून नागपूर ग्रामीण जिल्हा वाहतूक व स्थानिक वाहतूक पोलिसांनी कंबर कसून १२ सप्टेंबर रोजी २५ खासगी प्रवासी बसेसवर कारवाई करून दंड वसूल केला.
बुटीबोरी परिसरातील राष्ट्रीय महामार्गावरील वाढते रस्ता अपघात आणि अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामुळे शासकीय परिवहन उपक्रम व एसटीचे आर्थिक नुकसान होत आहे.
खासगी प्रवासी वाहनांकडून वाहतूक नियमांचे उल्लंघन होत असल्याच्या तक्रारीत वाढ झाल्याने बेकायदा होणाऱ्या प्रवासी वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्याची मागणी प्रवासी व नागरिकांकडून करण्यात येत होती.
त्यामुळे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक वैभव जाधव, पोलीस उपनिरीक्षक गजेंद्र तिवारी, पोहवा, नीलेश घोडे, पोशि.
देवेंद्र बुटले, धोंडिबा नागरगोजे, चालक पोशि, महादेव पटले यांनी अवैध प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या खासगी वाहनाविरोधात कारवाईचा बडगा उगारला.
स्थानिक पोलीस ठाण्यातील वाहतूक पोलीस अशा वाहनांवर कार्यवाहीची तोफ डागणार असल्याची माहिती
बुटीबोरीचे ठाणेदार प्रतापराव भोसले यांनी दिली.
त्यामुळे अवैध वाहतूक करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.