अपहरण करून खंडणी मागणारे आरोपी जेरबंद

एमआयडीसी बुटीबोरी पोलिसांची कामगिरी

एका ४ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करून नंतर तिच्या पालकांना लक्ष रुपयांची खंडणी मागणाऱ्या आरोपींना एमआयडीसी, बुटीबोरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आकाश महेश सोनवाने (१८), रा. गणेशपूर एमआयडीसी बुटीबोरी व संकेत महादेव ठाकरे (२२), रा. टेंभरी एमआयडीसी बुटीबोरी अशी अटकेतील आरोपींची नावे आहे.


प्राप्त | माहितीनुसार फिर्यादीची ४ वर्षीय अल्पवयीन मुलगी (दि. २३) घरासमोरील अंगणात खेळत असताना आरोपींनी तिचा चॉकलेट घेऊन देण्याचे आमिष दाखवून आपल्या दुचाकीवर बसवून पळवून नेले. दरम्यान फिर्यादीने यासंदर्भात एमआयडीसी, बुटीबोरी
पोलिसात तक्रार करून आकाश व संकेतवर संशय व्यक्त केला. पोलिसांनी त्वरित वरिष्ठांना माहिती देऊन संशयीत आरोपीचे मोबाईल लोकेशन मिळविले व काही पोलिस कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी पाठविले.

तेवढ्यात संशयीत आरोपीने अनोळखी नंबरवरून फिर्यादीला फोन करून तुझी मुलगी माझ्या ताब्यात असल्याचे सांगून ७ लाख रुपयांची खंडणी मागितली, अन्यवा मुलीला मारून टाकण्याची धमकीही दिली. यावेळी पोलिसांनी फिर्यादीस आरोपीसोबत जास्तीतजास्त वेळ बोलण्यास सांगितले व यादरम्यान त्यांनी आरोपींचे लोकेशन मिळविले.

लोकेशनवरून आरोपी डोंगरगाव शिवारात असल्याचे कळताच पोलिसांनी सापळा रचून त्या ठिकाणी घाड मारीत मुलीला सुरक्षितरित्या ताब्यात घेत आरोपींना अटक केली. आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक रामेश्वर रामेश्वर राम हे करीत आहे.

butibori

कारवाई पोलिस अधीक्षक नागपूर ग्रामीण विजयकुमार मगर, उपविभागीय पोलिस अधिकारी पूजा गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अशोक कोळी, पोलिस उपनिरीक्षक रामेश्वर राय, डीबी पथकाचे इकबाल शेख, प्रफुल राठोड, किशोर डेकाटे, रमेश नागरे, भास्कर मेटकर, दीप पांडे, प्रवीण सिराम, अमोल कोठेकर, रोशन बावणे, वंदना सारखे, सुषमा धनू सतीश राठोड आदीसह इतर कर्मचाऱ्यांनी यशस्वी केली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *