गळफास लावून संपविले जीवन : बुटीबोरीतील घटना

बुटीबोरी: आई बाथरूममध्ये कपडे धूतअसताना तरुणाने मुख्य खोलीचे दार आतून बंद करीत गळफास लावून आत्महत्या केली. वडील आल्यानंतर घरी हा प्रकार उघड झाला ही घटना बुटीबोरी शहरात मंगळवारी (दि. १६) दुपारी ३:३० वाजताच्या सुमारास उघडकीस आली.

नीलेश विलास राखुंडे (१९, रा. प्रभाग क्रमांक-९, जुनी वसाहत, बुटीबोरी, ता. नागपूर ग्रामीण) असे मृताचे नाव आहे. नीलेशने इयत्ता १० वीपासून शिक्षण सोडल्याने तो बुटीबोरी शहरातील कापडाच्या दुकानात नोकरी करायचा. मंगळवारी दुपारी वडील कामानिमित्त बाहेर गेले होते, तर आई बाथरूममध्ये कपडे धूत होती.

त्यावेळी नीलेश मुख्य खोलीत एकटाच मोबाइल बघत बसला होता. दुपारी ३:३० वाजताच्या सुमारास वडील घरी परत अल्यानंतर त्यांना मुख्य खोलीचे दार आतून बंद असल्याचे दिसले. मोबाइलवरील गाण्याचा आवाज ऐकायला येत होता. त्यामुळे त्यांनी घराच्या मागच्या भागाला जात नीलेशच्या आईला घरी कोण आहे, अशी विचारणा केली. तिने नीलेश संशय आत घरी असल्याचे सांगताच त्यांना आला. त्यांनी खोलीचे दार तोडून बघितले असता, त्यांना नीलेश लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. त्याने दुपट्ट्याच्या मदतीने लाकडी फाट्याला गळफास लावून घेतला होता.
त्यांनी नीलेशला उचलून धरले तर आईने आरडाओरडा केल्याने शेजारी धावून आले. त्यांनी नीलेशला लगेच बुटीबोरी शहरातील खासगी हॉस्पिटलमध्ये नेले. तिथे डॉक्टरांनी तपासणीअंती मृत घोषित केले.

माहिती मिळताच पोलिस उपनिरीक्षक कुमुदिनी पाथोडे व सहायक फौजदार सुरेश धवराळ यांनी रुग्णालय व नीलेशच्या घरी भेट देऊन पंचनामा केला. त्याच्या आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. याप्रकरणी बुटीबोरी पोलिसांनी नोंद करून तपास सुरू केला आहे