खड्डयात पडून एका कामगाराचा मृत्यू

बुटीबोरीः कामावरून दुचाकीने घरी परतत असताना रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात पडून एका कामगाराचा मृत्यू झाला.

ही घटना १२ आक्टोंबर रोजी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास बुटीबोरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सनविजय इन्फ्रास्ट्रक्चर प्रा लिमिटेड या कंपनी समोरील सर्व्हिस रोड वर घडली. अनुप रामचंद्र रामटेके (२९) रा. अनुप रामटेके मराठा-ले-आउट बुटीबोरी असे मृताचे नाव आहे. अनुप हा स्थानिक औद्योगिक क्षेत्रातील सनविजय इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीत कामगार होता.

घटनेच्या दिवशी सकाळी ७ वाजता तो कामावर गेला होता. सुट्टीचे सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास तो परत निघाला. काही वेळाने कंपनी समोरील सर्व्हिस रोडच्या कडेला असलेल्या खड्डयात तो पडून असल्याचे लोकांना दिसले. एका परिचिताने ही माहिती त्याचा भाऊ रोशनला व बुटीबोरी पोलिसांना दिली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *