स्वर्गीय नारायणराव वारघणे विद्यानिकेतन, बुटीबोरीचा दहावीचा निकाल 100% – गुणवत्तेचा नवा आदर्श

स्वर्गीय नारायणराव वारघणे विद्यानिकेतन, बुटीबोरीचा दहावीचा निकाल गौरवास्पद

बुटीबोरी (प्रतिनिधी) – स्वर्गीय नारायणराव वारघणे विद्यानिकेतन, उमरेड रोड, बुटीबोरी या शैक्षणिक संस्थेने यंदा इयत्ता दहावीच्या परीक्षेत शंभर टक्के निकाल लागवून आपल्या यशाची परंपरा कायम ठेवली आहे. सर्वच विद्यार्थ्यांनी उत्तम गुणांनी यश संपादन केल्याने शाळेचे वातावरण आनंदमय झाले आहे.

शाळेचे संस्थापक यांचे शिक्षण क्षेत्रातील योगदान लक्षात घेता, हा निकाल त्यांना वाहिलेली आदरांजली ठरली आहे. यशस्वी निकालामागे संस्थेचे अध्यक्ष, मुख्याध्यापक, शिक्षकवृंद आणि विद्यार्थ्यांचे अथक परिश्रम असून पालकांचे सहकार्यही महत्त्वाचे ठरले.

या घवघवीत यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष, मुख्याध्यापक व शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले असून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *