बुटिबोरी (नितीन कुरई )- बुटीबोरीतील केडीके इंटरनॅशनल स्कूल,मध्ये पालकांच्या आंतरिक कला गुणांना वाव देण्याच्या माध्यमातून “रंग खुशीयों के” चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असता शेकडोच्या संख्येत पालकांनी उस्फुर्त प्रतिसाद दाखवित सहभाग नोंदविला व आनंदात मग्न होऊन पालकांनी या स्पर्धेत मनसोक्त आनंद उपभोगला.

विद्यार्थ्यासह आता पालकांनी ही आपल्या बाल्यवस्थाना उजाळा देण्याच्या व आपल्या कल्पना शक्तीला रंगातुन रेखाटन्याचा सुंदर उपक्रम बुटीबोरीतील केडीके इंटरनॅशनल स्कूलच्या वतीने शालेय परिसरात निशुल्क रंग खुशियो के चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली.

दिनांक २२ फेब्रुवारी२०२५ चा रविवार पालक वर्गांकरीता खूप आनंददायी ठरला.या चित्रकला स्पर्धेत पालकांचा प्रचंड प्रतिसाद बघायला मिळाला.विविध विषयांवर पालकांनी दिलेल्या वेळेत चित्र रेखाटण्यास सुरुवात केली.या स्पर्धेचे परीक्षक प्रवीण खोपडे (सेलू) यांनी सुंदर रेखाटलेल्या चित्राचे परीक्षण करून तत्काळ निकाल जाहीर केला.

स्पर्धेत पहिला क्रमांक अनमोल गायकवाड,द्वितीय क्रमांक वैष्णवी कडू,तृतीय क्रमांक नीता पारवे,यांना शाळेच्या वतीने भेटवस्तू व प्रशस्ती पत्र व सन्मानचिन्ह देण्यात आले.तर अनेक प्रोत्साहन पर पुरस्कार देऊन अनेकांचा सन्मान या प्रसंगी करण्यात आला.स्पर्धेमुळे पालकांच्या मनात एक वेगळीच उमेद बघायला मिळाली.आपल्या कल्पना शक्तीला रंगाच्या माध्यमातून चित्रात रेखाटत असतांना विद्यार्थ्या प्रमाणे पालक सुद्धा अगदी तल्लीन झाल्याचे दिसून येत होते.

या प्रकारच्या उपक्रमातून जीवनातील ताण जरा बाजूला सारून एक नवीन विरंगुळा तयार होतो आणि त्यामुळे प्रत्येकात एक नवीन चेतना जागृत होत असते.या उपक्रमाचा उद्देश पालकांमध्ये कल्पना शक्तीला भरारी देणे आणि कलात्मक प्रतिभेला प्रोत्साहन देणे हा होता.असे मत केडीके शाळेतील मुख्याधिपिका तब्बसुम बक्ष मॅडम यांनी या प्रसंगी व्यक्त केले.या सुंदर आयोजन करीता शाळेतील मुख्याध्यापिका तब्बसुम बक्ष मॅडम,श्वेता पारीक,सुनीता बांते मॅडम यांच्या सह पवन पनपालिया यांचे मौलाचे सहकार्या लाभले.