महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत बुटीबोरीत कार्यकर्त्यांचे जंगी प्रवेश

बुटीबोरी: बुटीबोरीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत मोठ्या संख्येने कार्यकर्ते दाखल झाले आहेत. या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा उपाध्यक्ष बिजाराम किनकर आणि प्रदेश उपाध्यक्ष किशोर जी सरायकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नागपूर जिल्हा सचिव अजय शिरसवारही उपस्थित होते.


या कार्यक्रमात शिवम ताटेवार, सोहम जलुलकर, दर्शन बोरकर, यश तुम्दम, मुकेश चंदनखेडे, धनजय येळे, प्रशांत पंद्रे, यश रडके, सार्थक तेलहांडे, सर्वेश निनावे, कुणाल, लखन खंडारे, अक्षय बाथ, दर्शन काळे, ओम राठोड, रोहित आत्राम, शशांक भोयर, आदर्श मरसकोल्हे यांसह बुटीबोरी, हनुमान नगर, वारंगा आणि सातगाव या भागातील अनेक कार्यकर्त्यांनी मनमानं पक्षात प्रवेश केला.


या प्रवेशामुळे बुटीबोरीत मनसेचा विस्तार झाला असून, पक्षाची ताकद वाढली आहे. कार्यक्रमात बोलताना बिजाराम किनकर यांनी पक्षाच्या विविध ध्येयधोरणांची माहिती कार्यकर्त्यांना दिली आणि त्यांना एकजूट राहून पक्षाच्या उद्देशांसाठी काम करण्याचे आवाहन केले. किशोर जी सरायकर यांनीही कार्यकर्त्यांच्या उत्साहाचे कौतुक केले.
या कार्यक्रमामुळे बुटीबोरी आणि परिसरातील अनेक मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची बुटीबोरी येथील प्रतिष्ठा वाढली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *