नागपुर, (17AUG) – आज जिल्हा नियोजन हॉल, नागपुर येथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजने अंतर्गत एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात नागपुर जिल्ह्यातील हजारो महिलांना त्यांच्या बँक खात्यात ३००० रुपये जमा झाल्याबद्दल अभिनंदन करण्यात आले.
या कार्यक्रमात नागपुर जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत मुख्य अतिथी म्हणून हिंगणा विधानसभा अध्यक्ष श्री. बबलुजी गौतम उपस्थित होते. त्यांनी या योजनेचा लाभ घेणाऱ्या सर्व महिलांना मार्गदर्शन केले आणि या योजनेचे महत्त्व विशद केले.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजना ही महिला सक्षमीकरणाच्या दिशेने उचललेले एक महत्त्वाचे पाऊल आहे. या योजनेअंतर्गत महिलांना आर्थिक सहाय्य करून त्यांना स्वावलंबी बनवण्याचा प्रयत्न केला जात आहे.
या कार्यक्रमात उपस्थित महिलांनी या योजनेचे कौतुक केले आणि सरकारचे आभार मानले. त्यांनी सांगितले की, या योजनेमुळे त्यांना आर्थिक स्वावलंबी बनण्यास मदत मिळणार आहे.