नागपूर : कर्मयोगी फाउंडेशनने ज्येष्ठांना प्रेमरूपी आधार देण्यासाठी आपले बोलते नव्हे तर कर्ते व्हा हे तत्व जपत आधार काठी वाटपाच्या उपक्रमाची सुरुवात बोरखेडी येथून २७ जून २०२१ रोजी केली होती.

पुढे ग्रामीण भागातील घरोघरी वृद्ध लोकांचे सर्व्हेक्षण करून २०२१ ते २०२४ या तीन वर्षात २०० गावांतील १० हजार पेक्षा जास्त वृद्ध मंडळींना आधार काठीचे वाटप करून एक आदर्श निर्माण केला आहे.

नुकताच सम्राट अशोक बुद्ध विहार दवलामेटी येथे आधार काठी वाटपाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी १०१ वृद्धांना आधार काठी देण्यात आली. विशेष म्हणजे दवलामेटी हे आधार काठी वाटप करण्यात येणारे २०० वे गाव होते.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष दवलामेटी ग्रा.पं. च्या माजी सरपंच रिता उमरेडकर, उद्घाटक कर्मयोगी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष पंकज

ठाकरे तर प्रमुख अतिथी म्हणून माजी तंटामुक्ती अध्यक्ष प्रकाश मेश्राम, सोनिया वानखेडे, प्रवीण अंबादे, नागेश बोरकर, रोहित राऊत आदी उपस्थित होते.