5 जिवंत काडतुसे जप्त, बुटीबोरी पोलिसांची कारवाई, आरोपीवर विविध ठाण्यांमध्ये गुन्हे
बुटीबोरी, वार्ताहर. स्थानिक बुटीबोरी पोलिस ठाण्यातील गुन्हे अन्वेशन शाखेचे पोलिस कर्मचारी गस्तीवर असताना त्यांनी एका संशयित इसमास ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्याच्याकडे एक माऊजर तसेच 5 जिवंत काडतुसे असल्याचे आढळून आल्याची घटना सोमवारी (दि. 24 जून) रात्री 11 ते 11.30 वाजताचे दरम्यान घडली. शुभम उर्फ शेरू अशोक उईके (24) रा. वार्ड क्र. 2, बौद्ध विहाराजवळ, खापरखेडा, ता.जि. नागपूर असे अटक आरोपीचे नाव असून सदरचा आरोपी हा अट्टल गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध विविध ठाण्यांतर्गत अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. ही कारवाई नागपूर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार, अप्पर पोलिस अधीक्षक रमेश धुमाळ, उपविभागीय पोलिस अधिकारी पूजा गायकवाड तसेच ठाणेदार हृदयनारायण यादव यांचे मार्गदर्शनाखाली सपोनी प्रशांत लभाणे, पोहवा आशिष टेकाम, युनूस खान, कृणाल पारधी, अरविंद चव्हाण पोशि दशरथ घुगरे, प्रदीप देशमुख यांनी केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार स्थानिक पोलिस ठाण्यातील कार्यान्वीत गुन्हे प्रगटीकरण पथकातील अधिकारी व अंमलदार हे घटनादिनी वरीष्ठांच्या आदेशाप्रमाणे पो.स्टे. अभिलेखावरील गुन्हेगार व अवैध धंद्यांवर कारवाई करण्याकरीता पेंट्रोलिंग करीत असताना मुखबीरद्वारे मिळालेल्या माहीती वरूण एक इसम नागपूर वर्धा मार्गावर उभा असुन त्याच्याजवळ माऊजर आहे, अशा गोपनीय माहीतीवरुन गुन्हे प्रगटीकरण पथकातील अधिकारी व अंमलदार त्या ठिकाणी पोहोचुन त्याची व त्याच्या ताब्यातील पिशवीची झडती घेतली असता त्याच्या ताब्यातील पिशवीत एक विदेशी बनावटीचे माऊजर किंमत अंदाजे 30 हजार रुपये व 5 जिवंत काडतुस किंमत 500 रुपये असा एकुण 30 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल माल मिळुन आला अशा फिर्यादीचे रिपोर्ट वरून पो.स्टे.ला अप क्र 475 / 24 कलम 3/25 भारतीय हत्यार कायदा अन्वये सदरचा गुन्हा नोंद असुन तपास सुरू आहे.
आरोपी हा सराईत गुन्हेगार
घटनेतील आरोपी शुभम उर्फ शेरू हा अट्टल गुन्हेगार असुन त्याचे विरूध्द पो स्टे खापरखेडा येथे खुन, खंडणी व अवैध्यरीत्या अग्नीशस्त्र बाळगणे सारख्ये गेंभीर गुन्हे दाखल आहे. तसेच हा आरोपी पोस्टे खापरखेडा येथून अवैध्यरीत्या अग्नीशस्त्र बाळगणे या गुन्हयात 8 दिवसापासुन फरार होता. अटकेनंतर पोलिसांनी आरोपीस न्यायालयात हजर करून दोन दिवसांची पोलिस कोठडी मिळवून घेतली असून पुढील तपास सपोनि प्रशांत लभाने पो स्टे बुटीबोरी हे करीत आहे.