गुन्हेगारी नियंत्रणासाठी व्यावसायिकांना ‘अल्टीमेटम’

पोलिसांकडून व्यावसायिकांना जबाबदाऱ्या निभावण्याच्या सूचना, बुटीबोरी पोलिस ठाण्यात संयुक्त बैठक

बुटीबोरी, वार्ताहर. वाढती गुन्हेगारी आणि त्यात तपासकामी येणाऱ्या पोलिसांच्या अडचणी यावर मात करण्यासाठी शहरातील तसेच मार्गांवरील व्यवसाय करणारे व्यावसायिक यांची खूप मोठी जबाबदारी असते. अनेक ठिकाणी गुन्हेगारी उघड करण्यासाठी पोलिसांना विविध समस्यांना सामोरे जावे लागते.

गुन्हेगाराविरुद्ध सबळ पुराव्याअभावी पोलिसांना येत असलेल्या अडचणीमुळे गुन्हेगार मोकाट फिरत असतात. यावर एकच उपाय म्हणून पोलिसांनी आता समस्त व्यावसायिकांना सजगतेचा इशारा दिला आहे. नागपूर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्या मार्गदर्शनाखाली बुटीबोरीच्या उपविभागीय पोलिस अधिकारी पूजा गायकवाड यांनी बुटीबोरी एमआयडीसी बोरी तसेच बेला पोलिस ठाण्याच्या हद्दीतील समस्त धाबे मालक, बार मालक, देशी भट्टी मालक यांची स्थानिक बुटीबोरी पोलिस ठाण्यात संयुक्त बैठक घेऊन सुरक्षेच्या दृष्टिकोनातून त्यांच्या असलेल्या जबाबदाऱ्यांसाठी विशेष ‘अल्टीमेटम’ दिला आहे. यात व्यासायिकांनी आपल्या आस्थापनामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवावे, वाहने पार्किंग करिता सुरक्षा गार्ड नेमावे, धाबे, हॉटेल सीसीटीव्ही कॅमेरे बसवावे, वाहने पार्किंग करिता सुरक्षा गार्ड नेमावे, धाबे, हॉटेल बार वेळेतच बंद करावे, धाब्यावर कोणत्याही प्रकारे अवैध धंदे चालणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. यावेळी बुटीबोरीचे ठाणेदार भिमाजी पाटील, एमआयडीसी बोरी ठाण्याचे महादेव आचरेकर, बेलाचे अजित कदम तसेच तिन्ही पोलिस ठाण्यातील पोलिस अधिकारी, खुपिया विभागाचे कर्मचारी आणि तिन्ही पोलिस ठाणे हद्दीतील सर्व व्यावसायिक उपस्थित होते. परिसरातील वाढती गुन्हेगारी ही सामान्य नागरिकांसाठी चिंतेचा विषय ठरत असून यावर नियंत्रण ठेवणारी पोलिस यंत्रणा अहोरात्र काम करत आहे. मात्र काही ठिकाणी समाजातील काही घटक आपले सामाजिक दायित्व झटकताना दिसून येतात. याआधी सुद्धा अनेकदा पोलिसांनी व्यावसायिकांना आपल्या जबाबदाऱ्या पाळण्याच्या सूचना दिल्या होत्या, मात्र याकडे कुणीही गांभीर्य दाखविले नाही अशी खंत देखील तिन्ही ठाणेदारांनी व्यक्त केली. मात्र आता यापलीकडे पोलिस यंत्रणा सतत व्यावसायिकांच्या आस्थापनाचा आढावा घेत राहणार, असे यावेळी सांगण्यात आले असून व्यावसायिक यावर किती गांभीर्याने आपली जबाबदारी स्वीकारेल याकडे सामान्यांचे लक्ष लागलेले आहे. महामार्गावरील अनेक धाब्यांवर रात्रीच्या वेळी काही असामाजिक तत्व दारू पिऊन धिंगाणा घालतात, अशा तक्रारी असल्यामुळे यातूनच संघटित गुन्हेगारीच्या घटना घडतात. यासाठी जर कुठे असे प्रकार आढळून आले तर सर्वप्रथम ढाबा मालकांवर गुन्हा दाखल करण्यात येईल ‘असा इशारा देखील या बैठकित देण्यात आला. आपल्या आस्थापनामध्ये असे कोणतेही गैरप्रकार होऊ नये, याची सर्वस्वी जबाबदारी मालकांची राहील असा तंबी वज इशारा यावेळी देण्यात आला आहे

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *