अनोळखी इसमाचाउपचारादरम्यान मृत्यू

बुटीबोरी, . रस्त्याच्या कडेला मूर्च्छित अवस्थेत पडून असलेल्या अज्ञात इसमाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना बुटीबोरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडल्याची घटना नुकतीच उघडकीस आली. प्राप्त माहितीनुसार वर्धा महामार्गावरील सावंगी शिवारात रस्त्याच्या कडेला एक अनोळखी इसम मूर्च्छित अवस्थेत पडून होता.

सदर इसमाला उपचारार्थ बुटीबोरी येथील एका खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले. इसमाची प्रकृती नाजूक असल्या कारणाने त्यास नागपूर येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. त्याचा 22 दिवसानंतर उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती फिर्यादी मेडिकल बूथचे सहाय्यक फौजदार प्रमोद वाडके यांनी बुटीबोरी पोलिसांना दिली.

घटनास्थळ गाठून पोलिसांनी पंचनामा केला. मृतक अनोळखी इसम हे अंदाजे 58 वर्षाचे असून उंची 5 फूट 5 इंच, सडपातळ बांधा, अंगावर ग्रे रंगाचा पांढरे पट्टे असलेला चौकोनी डब्यांचा हाफ शर्ट, ग्रे रंगाचा पांढऱ्या रेषा असलेला फुल पॅन्ट, लांबट चेहरा, डोक्यावरील आणि दाढीचे केस असे वर्णन असून अजूनही ओळख पटलेली नसून सदर वर्णनाचा इसम कुणाच्या ओळखीचा असल्यास त्यांनी बुटीबोरी पोलिस ठाण्यासी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पुढील तपास पोह अरुण कावळे करीत आहेत

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *