बुटीबोरी पोलिसांचे नागरिकांच्या हितार्थ मिशन ‘अलर्ट

जनजागृती • वाहतूक नियमांबाबत पोलिसांचे अभियान, ठिकठिकाणी होणार नाकाबंदी, नियम पाळण्याचे आवाहन

बुटीबोरी, वार्ताहर. एकीकडे रस्ते अपघात वाढत असून वाहतुकीचे नियम पाळण्यासाठी वाहतूक पोलिस आणि शासन वारंवार नागरिकांना आवाहन करत आहे. मात्र त्यानंतरही नागरिक काही ऐकण्याचे किंवा नियम पाळण्याचे नाव घेत नसल्याने आता बुटीबोरी उपविभागीय पोलिस क्षेत्रातील बुटीबोरीचे ठाणेदार भिमाजी पाटील, एमआयडीसी बोरीचे महादेव आचरेकर तसेच बेला पोलिस ठाण्याचे अजित कदम यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी पूजा गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांच्या हितार्थं मिशन ‘अलर्ट’ हाती घेतले आहे.

आगामी कागदपत्रांची तपासणी करत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर कारवाईची सणासुदीला कुठलेही गालबोट लागू नये म्हणून हे महाअभियान राबवून ठिकठिकाणी नाकाबंदी करून वाहनांच्या तोफ डागणार आहे. पोलिसांच्या या उपक्रमातून एकीकडे वाहतूक नियमांबाबत जनजागृती तर होणारच त्याचबरोबर दुसरीकडे वाहतूक नियम मोडणाऱ्यांना वाहन चालवितांना नियमांचे पालन तसेच आपल्या वाहनासंबंधीचे कागदपत्रे सोबत ठेवण्याचे आवाहन यावेळी पोलिसांनी केले आहे अनेकदा वाहन चालक वाहतूक नियमांचे उल्लंघन करून विरुद्ध दिशेने गाडी चालवणे, हेल्मेट न घालणे किंवा सीट बेल्ट न लावता गाडी चालवणे, दारू पिऊन वाहन चालविणे असे प्रकार सर्रासपणे करत असल्याचे निदर्शनास येते. पोलिसांकडून याबाबत नेहमीच जनजागृती करण्यात येत असते, मात्र त्यानंतरही वाहन चालक हे नियम पाळत नसल्याने पोलिसांनी अखेर वेगळ्या पद्धतीने त्यांना धडा शिकवण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या सणासुदीचे दिवस आहेत. पोळा, गणेश उत्सव आणि दुर्गा उत्सव या सणांच्या पार्श्वभूमीवर रस्त्यावर नागरिकांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते. त्यात काही उमेठ वाहनचालक सर्रास वाहतुकीचे नियम मोडतात. यातून अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आनंदाच्या या सणासुदीच्या काळात कोणत्याही कुटुंबावर दुःखाचे विरजण पडू नये म्हणून पोलिसांची ही भूमिका नागरिकांच्या हितार्थ असून यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी पोलिसांनी केले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *