शिक्षक दिनानिमित्त विद्यार्थ्यांत उत्साह.
बुटीबोरी :- शिक्षक दिना निमित्त बालाजी कॉन्व्हेन्ट मधील विद्यार्थ्यांनी शिक्षक दिना निमित्त प्रगत भारत बनविण्याचा संकल्प केला
५ सप्टेंबर भारतरत्न डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन”यांचा जन्मदिन सर्वत्र ‘शिक्षक-दिन’ म्हणून साजरा केला जातो.गुरु-शिष्यांच्या’ पवित्र बंधनाला आणखी दृढ करणारा हा दिवस होय.शिक्षक वर्षानुवर्ष करत येत असलेल्या कार्याची व जबाबदारीचे महत्व सांगणारा हा दिवस आहे.
बुटीबोरीतील बालाजी कॉन्व्हेन्ट मराठी मध्ये ५ सप्टेंबर शिक्षक दिन मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला.या दिनाचे औचित्य साधून शाळेतील विद्यार्थी एक दिवसाकरीता शिक्षकांच्या भूमिकेत दिसून आले.लहान-लहान विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांप्रमाणे वेशभूषा करून शिक्षकांच्या भूमिकेचे नाट्यीकरनातून शिक्षकांच्या भावना व्यक्त केल्या.
विद्यार्थ्यांना शिकवत असताना निर्माण होणाऱ्या अडचणीची आज अनुभूती झाली.विद्यार्थ्यांनी या दिवसाचा उत्साह दर्शवित शिक्षक दिन मोठ्या आनंदाने साजरा केला.राधाकृष्ण यांनी दाखविलेल्या मार्गावर चालून आजचा विद्यार्थी कशाप्रकारे प्रगत होऊ शकतो व विद्यार्थ्यांनी शिक्षकाला नेहमी गुरुचे स्थान द्यावे या प्रकारचे वक्तव्य विद्यार्थ्यांच्या मनोगतातून ऐकायला मिळाले.
कनिष्ठ महाविद्यालयचे प्राचार्य प्रविण भोयर यांनी विद्यार्थ्यांना समोर येणारे संभाव्य धोके कशाप्रकारे हाताळता येईल व आजच्या या स्पर्धेच्या युगात अभ्यासाची काळानुसार गरज काय याचे महत्व पटवून दिले.या प्रसंगी बालाजी बालाजी कॉन्व्हेन्ट माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका दीपा हरतालकर इंग्रजी माध्यमच्या मुख्याध्यापिका जयश्री टाले,मराठी माध्यमचे मुख्याध्यापक निखिल साबळे,व समस्त शिक्षक वृंद उपस्थित होते.