‘मप्रयुकाँ’ चे विमा हॉस्पिटलकरिता आंदोलन आज

बेशरमची झाडे लावून करणार निषेध

नागपूर एमआयडीसी बुटीबोरी येथील प्रलंबित असलेल्या विमा हॉस्पिटलचे काम जलद गतीने व्हावे. कामगारांना अत्याधुनिक व जलद सेवा मिळावी, या मागण्यांसाठी महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेस (मप्रयुका) व एकता कामगार संघटनेच्या संयुक्त विद्यमाने उद्या गुरुवारी मप्रयुकाचे महासचिव मुजीब पठाण यांच्या मार्गदर्शनात व महाराष्ट्र राज्य युवक कॉंग्रेस अध्यक्ष कुणाल राऊत यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात येणार असून, ‘बेशरम’ची झाडे लावून सरकारचा निषेध करणार आहे.

बुटीबोरी औद्योगिक क्षेत्र स्थापन होऊन जवळपास ३४ वर्षांचा काळ लोटला. दरम्यानच्या काळात अपघातात शेकडो लोकांना प्राण गमवावा लागला. शेकडो स्त्रिया विधावा झाल्यात तर शेकडो

मुलांचे पितृत्व हरवले आहे. त्यातच औद्योगिक क्षेत्रातील लाखो कामगार महिन्याकाटी ५.५ टक्के हिशोबाने ईएसआयसीला करोडो रुपये भरत असतात. असे असतांना विमा हॉस्पिटल बनण्यासाठी ऊशीर का होतो आहे ? असा प्रश्न मुजीब पठाण यांनी उपस्थित केला आहे.

बुटीबोरी औधोगिक क्षेत्रात मंजूर २०० खाटाचे विम्याचे हॉस्पिटलचे काम डिसेंबर २०२२ ला सुरु झाले. दोन महिने हॉस्पिटलच्या नावावर खड्डे खोदण्यात आले. पुढे तीन महिन्यांपासून काम बंद आहे. अधिकाऱ्यांनी हजारो ब्रास मरुम रात्रीच्या अंधारात विकला व काम रेंगाळत ठेवले. विमा दवाखान्याचे काम त्वरित सुरु करून दवाखाना जनतेच्या सेवेसाठी उपलब्ध करून करण्यासाठी महाराष्ट्र राज्य काँग्रेस कमिटीचे महासचिव मुजीब पठाण यांच्या मार्गदर्शनात महाराष्ट्र राज्य युवक काँगेस अध्यक्ष कुणाल राऊत उद्या आंदोलन करणार असून, दवाखान्याकरीता खोडलेल्या खड्यात बेशरमची झाडे लावून लावून शासनाचा निषेध करणार आहे. आंदोलनात एमआयडीसीतील कामगारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस महासचिव मुजीब पठाण यांनी केले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *