
भारताला महासत्ता बनवणारे वैज्ञानिक बुटीबोरीतून मिळणार … डॉ.प्रकाश नेऊलकर
बुटीबोरी – विज्ञान व विज्ञानाचे चमत्कार खरच अतुलनीय तसेच नेत्रदीपक असतात मनाला वेड लावणारे असे विज्ञानाचे चमत्कार आपल्या अवतीभवती व संपूर्ण जगात बघायला मिळत आहे. देशाचे भविष्य समजल्या जाणाऱ्या शाळेतील विद्यार्थ्यांना विज्ञानाची ओढ लावण्यासाठी बालाजी कॉन्व्हेन्ट मध्ये विज्ञान प्रदर्शनीचे सफल आयोजन करण्यात आले.

११ मार्च शनिवारला बालाजी कॉन्व्हेन्ट इंग्रजी माध्यमच्या मुख्याध्यापिका जयश्री टाले यांच्या मार्गदर्शनात नर्सरी ते आठवी मधील विद्यार्थ्यांनी डोळ्याचे पारणे फेडणारे जवळपास ९० वैज्ञानिक प्रयोग (मॉडेल्स) तयार करून विज्ञान प्रदर्शनीला हजेरी लावली. या प्रसंगी शाळेतील अजय गुरनुले, किशोर सावरकर, नीलम पोहाने, प्राची मेंढे, पुजा बक्ष, कविता येळणे, मीनाक्षी लकडे, पुनम मॅडम, सपना तांबोळी, डेकाटे मॅडम, जयश्री मॅडम, ज्योती, उपस्थित होते. डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या विज्ञान मार्गावर चालून कलाम यांचे स्वप्न साकार करण्याचा एक प्रयत्न बालाजी कॉन्व्हेंट मधील इंग्रजी माध्यम मधील विद्यार्थ्यांनी केला.

विद्यार्थ्यांनी कागद, खर्डा, बांबू, निरुपयोगी प्लास्टिक वस्तू पासून अनेक प्रयोग तयार करून या विज्ञान प्रदर्शनीत ठेवण्यात आले. ७०० हून अधिक विद्यार्थ्यांनी व पालकांनी या प्रदर्शनाचा अनुभव घेतला. जयश्री टाले तसेच विज्ञान शिक्षिका सपना खरड, मनीषा भोयर, प्रनोती पारखी, प्रिया खंडाते, रुपाली मुखर्जी, क्रिस्टिना सोनी, व पाहुण्यांनी संपूर्ण प्रदर्शनीची पाहणी करून विद्यार्थ्याच्या प्रयोगास क्रमांक दिला.

याकरिता शाळेतील संपूर्ण शिक्षक वृंदानी तसेच विध्यार्थी व पालकांचे सहकार्य लाभले त्याबद्दल शाळेचे संचालक डॉ. प्रकाश नेऊलकर यांनी विध्यार्थी पलकासह संपूर्ण शिक्षकांचे कौतुक केले व भारताला महासत्ता बनवणारे वैज्ञानिक बुटीबोरीतून मिळणार असे मत व्यक्त केले. *कोट. डॉ. प्रकाश नेऊलकर — (संचालक बालाजी कॉन्व्हेन्ट ) या सफल आयोजन करीता शाळेतील शिक्षक, विध्यार्थी व पालकांचे मोठ्या प्रमाणात सहकार्य लाभले ज्यामुळे विद्यार्थ्यांनी खरोखरच विज्ञानाच्या उत्कृष्ट प्रयोगांचे नमुने सादर केले. तयार केलेल्या प्रयोगातून भारताला महासत्ता बनवणारे वैज्ञानिक नक्कीच तयार होतील अशी आशा बाळगतो व या विद्यार्थ्यांना पुढील आयुष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा देतो.
