बुटीबोरी :- २६ नोव्हेंबर सविधान दिनानिमित्त म्हणून बालाजी कॉन्व्हेन्ट प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी उद्देश पत्रिकेचे वाचन करून संविधानाचा प्रसार व जतन करून दर दिवशी प्रास्तविकेचे वाचन करण्याची प्रतिज्ञा घेतली.शाळेच्या प्रांगणात कार्यक्रमाचे आयोजन केले असता कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन वाटमोडे यांनी केले.कार्यक्रमाचे अध्यक्ष मराठी माध्यमचे मुख्याध्यापक निखिल साबळे प्रमुख अतिथी वैभव खोब्रागडे व नितीन कुरई सर यांनी विद्यार्थ्याला संविधान दिनाचे महत्व सांगितले.
आज संविधान दिना निमित्त सर्व विद्यार्थ्यांनी संविधानचे वाचन केले.त्यानंतर विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून आपले विचार व्यक्त केले.सविधान म्हणजे देशाला मिळालेले एक वरदान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अथक प्रयत्नायांनी हे लिखित संविधान भारतास प्राप्त झाले.याचे जतन करण्याचा संदेश कार्यक्रमाचे अध्यक्ष निखिल साबळे व वैभव खोब्रागडे यांनी दिला.
तर तसेच मुंबईमध्ये झालेल्या मुंबई ताज हॉटेल आतंकी हल्ल्यात वीर सपुताणी या आतंकवादयाशी कश्या प्रकारे लढा दिला.याची विस्तृत माहिती नितीन कुरई सर यांनी विद्यार्थ्यास दिली.या हल्ल्यात शहीद झालेल्या वीर शहिदांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.कार्यक्रमाचे आभार रोहन तावरे यांनी व्यक्त केले. या प्रसंगी मराठी माध्यम मधील शिक्षिका हर्षा कातकडे उपस्थित होत्या.