बुटीबोरी: नुकत्याच गोरोबा मैदान, वर्धमान नगर, नागपूर येथे आयोजित जिल्हा व मनपास्तरीय कराटे चॅम्पियनशिपमध्ये बुटीबोरीतील सेंट क्लारेट शाळेतील कराटेपटूंनी चमकदार कामगिरी करीत बुटीबोरीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. बुटीबोरीमधील नामांकित सेंट क्लारेट शाळेतील अंडर १४ व १७ वयोगटातील प्रथम श्रेणीमध्ये वेदांत इरपाते (१७), समीक्षा गोंडूले (१७), मोहिनी मोवाडे (१४), द्वितीय श्रेणीत अदिती पंचभाई (१७), तृष्णा पटले (१४), देवांशु डबुरकर (१४) यांनी पदक पटकावून आपल्या शाळेचे व गावाचा नावलौकीक केला.
१६ नोव्हेंबर रोजी आयोजित करते स्पर्धेत सेंट क्लारेट शाळेतील ६ विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी करत ‘जीत कुंडो (फाइट)’ मध्ये अंडर १४ व १७ वयोगटात पदक आपल्या नावावर करणाऱ्या विद्यार्थ्यांवर आज अनेक स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. या स्पर्धेत जिल्ह्यातील विविध खेळाडूंचा समावेश होता. विद्यार्थ्यांनी या चमकदार कामगिरीचे श्रेय आपल्या पालकांसह कराटे कोच व शाळेचे मुख्याध्यापक, फादर मार्टिन डिसुजा, मॅनेजर फादर वरगीस, फादर टोनी, फादर राजेश, कराटे प्रशिक्षक सुमीत नागदवेसर आणि शिक्षकां वृंद यांना दिले. या प्रसंगी सर्व विजेत्या विद्यार्थ्यांचा सत्कार करून पुढील वाटचाली करीता विद्यार्थ्यांसह पालकांना सुद्धा शुभेच्छा दिल्या.