बुटीबोरी – स्थानिक बुटीबोरी पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या देवळी (गुजर) येथील स्व. नारायणराव वरघने या शाळेत 154 विध्यार्थ्यांना लसीकरण करण्यात आले. या लसीकरणाकरिता आलेल्या बोरखेडी
प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉ. साची मॅडम परिचारिका माधुरी मॅडम, सरला मॅडम यांचे शाळेचे संस्थापक श्री वरघने सर, हरिणखेडे मॅडम व केचे मॅडम यांनी पुष्पगुछ देऊन स्वागत केले. या लसीकरणामध्ये 12 ते 16 वयोगटातील विध्यार्थ्यांना लस देण्यात आली.
विद्यार्थ्यांची नाव नोंदणी करण्यासाठी शाळेतील सहाय्यक शिक्षक ठोंबरे सर, कुडवे सर,गुल्हाने मॅडम, रहांगडाले मॅडम, बोपचे मॅडम, तसेच लसीकरण यशस्वी होण्यासाठी शाळेतील शिक्षिका बुरडकर मॅडम, पन्नासे सर, व इतर शिक्षिका आणि शिक्षकेत्तर कर्मचारी संगीता कटरे, अनिता मेश्राम मंगेशजी तिमांडे यांनी अथक परिश्रम घेतले.