इमारतीवरून कोसळून तरुणाचा मृत्यू

बुटीबोरी: इमारतीवरून कोसळून तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना बुटीबोरी पोलीस ठाण्यांतर्गतच्या सातगाव येथे नुकतीच उघडकीस आली.

दिवाकर रमेश चचाणे (३२, रा. सातगाव झोपडपट्टी, कन्हाळगाव), असे मृत तरुणाचे नाव आहे. •दिवाकर हा आपल्या घरावरील काम पाहत होता. अशातच अचानक तोल गेल्याने तो इमारतीवरून खाली पडला. त्यात त्याला गंभीररीत्या दुखापत झाली.

लगेच त्याला प्रथम बुटीबोरी येथील खासगी हॉस्पिटल व त्यानंतर नागपूर मेडिकल रुग्णालयात भरती करण्यात आले. तिथे गुरुवारी (दि. १६) उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

butibori

याप्रकरणी मेडिकल पोलीस बूथच्या सूचनेवरून बुटीबोरी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरु केला आहे

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *