तेज रफ्तार कार ने ट्रक को टक्कर मारदी

ayansh tvs

एक घायल : बुटीबोरी इलाके की घटना

बुटीबोरी: राँग साईडने वेगात जाणाऱ्या कारने समोरून येत असलेल्या ट्रकला जोरात धडक दिली. यात एक जखमी झाला. शिवाय, दोन्ही वाहनांचे नुकसान झाले. ही घटना बुटीबोरी (ता. नागपूर ग्रामीण) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उमरेड बायपास रोडवर शनिवारी (दि. २१) रात्री ११ वाजताच्या सुमारास घडली.

butibori

●भोजराज विठोबाजी गेडाम (४८, रा. बोपापूर, ता. हिंगणघाट, जिल्हा वर्धा) असे जखमीचे नाव आहे. भोजराज गेडाम हे ट्रकने नागपूरहून हिंगणघाटला जात होते. दरम्यान, चंद्रपूर रोडने राँग साईडने एमएच-३१/टीएफ-५२१२ क्रमांकाची कार वेगात आली आणि ट्रकवर धडकली. यात दोन्ही वाहनांचे नुकसान झाले असून, भोजराज गेडाम जखमी झाले. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व भोजराज गेडाम यांना उपचारासाठी बुटीबोरी येथील रुग्णालयात आणले.

याप्रकरणी बुटीबोरी पोलिसांनी भोजराज गेडाम यांच्या तक्रारीवरून अमोल राजेश काळे, रा. अवस्थीनगर, पोलीस लाईन टाकळी, नागपूर याच्याविरोधात भादंवि २७९, ३३७, ३३८, ४२७ अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.