butibori

१० हजार नागरिकांनी घेतला अन्नदानाचा आस्वाद.

ayansh tvs

कामगार दिनी भव्यदिव्य अन्नदान करून कर्मयोगीने जपली कृतज्ञता..
★ १० हजार नागरिकांनी घेतला अन्नदानाचा आस्वाद…
कर्मयोगी फाऊंडेशन हे बोलते नव्हे तर कर्ते व्हा या तत्वावर कार्य करणारे सेवाभावी संघटन आहे. बुटिबोरी औद्योगिक क्षेत्रात जवळपास १ लाख कामगार कार्यरत आहेत. बुटिबोरी येथे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ स्थापन होऊन जवळपास ३० वर्ष जाले. परंतु येथे आजपर्यंत कोणीही कामगार दिन साजरा केला नव्हता. ही बाब लक्षात घेवून बुटीबोरी औद्योगिक क्षेत्र भरभराटीस आणण्यासाठी ज्यांनी आपल्या रक्ताचं पाणी केलं , कंपनीच्या भरभराटीस्तव प्रसंगी अनेकांची प्राणज्योत मावळली, अनेकांना कायमचं अपंगत्व आलं अशा सर्व कामगार बांधवांप्रती कृतज्ञता व्यक्त करत १ में कामगार दिनी मेट्रो चौक बुटिबोरी येथे भव्यदिव्य अन्नदानाचे आयोजन करण्यात आले होते.

butibori

अन्नदानात पोळी, भाजी, दाल तड़का, आलू भात, कढी, जिलेबी, आचार,पापळ, चटणी, सलाद, हे सर्व पदार्थ ठेवून तसेच उन्हाळा लक्षात घेऊन प्रत्येकाच्या ताटापर्यंत थंड पाण्याची सोय करत अन्नदानाची अतिशय सुंदर व्यवस्था करण्यात आली होती. अन्नदानाचा आस्वाद घेताना अनेक कामगार भावुक झाले. कामगारांसाठी असा कार्यक्रम आजपर्यंत कोणीही केलेला नाही. तो कार्यक्रम कर्मयोगी फाऊंडेशनने करून कामगारांच्या मना मनावर राज्य करून इतिहास रचला असे अनेकांनी बोलून दाखविले.


या कार्यक्रमाची विशेषतः म्हणजे
या कार्यक्रमाचे अध्यक्ष इंडोरामा कंपनीचे कामगार नरेश मुने, उदघाटक
मोरारजी टेक्सटाईलचे कामगार किशोर गोहणे, प्रमुख उपस्थितीत लेमकेन इंडियाचे कामगार
सुरेश ढोले, ग्राईंडवेल नॉर्टनचे कामगार
बबलू गोखे, केईसीचे कामगार
राम देशमुख ही सर्व कामगार मंडळी व्यासपीठावर उपस्थित होती.
यावेळी या सर्व कामगार पाहुण्यांना कर्मयोगी फाऊंडेशन तर्फे शाल, श्रीफळ, गुलाबपुष्प देऊन सन्मानित करण्यात आले.

butibori


कार्यक्रमाचे अध्यक्ष सुरेश मुने म्हणाले की माणूस हा प्रामाणिक कष्टाने मोठा होतो. आम्ही वर्षभर राबराब राबतो त्या आमच्या कष्टाची दखल घेत आज अतिशय गरिबीच्या परिस्थितीतुन समोर आलेल्या आमच्या कामगार मित्रांची संस्था कर्मयोगी फाऊंडेशनने इतक्या मोठ्या प्रमाणात अन्नदान राबवून व आमचा सन्मान करून खऱ्या अर्थाने कामगार बंधवाप्रती कृतज्ञता जपली..
या अन्नदानाला सामाजिक कार्यकर्ते राजु गावंडे, याजेंद्रसिंग ठाकूर, दिनेश इंगोले, गजानन गावंडे, अरविंद डुकरे, पत्रकार विजय ठाकरे, सुभाष राऊत गुरुजी, गणेश सोनटक्के, संदीप बालविर, चंदू बोरकर, सुरेश रोहनकर या प्रतिष्ठित मंडळींनी भेट देऊन या अन्नदान कार्याची शोभा वाढविली..
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कर्मयोगी फाऊंडेशन परिवारातील मंडळींनी मोठ्या प्रमाणात यशस्वी मेहनत घेतली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *