मोतीबिंदू तपासणी शिबीर संपन्न

कर्मयोगी फाऊंडेशन हे सातत्याने ग्रामीण भागातील गोरगरीब गरजवंत मंडळींसाठी विविध उपक्रम राबवून सेवा देत आहे. त्याचीच प्रचीती म्हणजे कर्मयोगी फाऊंडेशन व समता फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सोनेगाव बोरी ता. जिल्हा नागपूर येथे दि. ९ एप्रिल २०२२ रोज शनिवारला मोतीबिंदू तपासणी शिबीर पार पडले.

ayanshtvs butibori


शिबिरात ५८ रुग्णांनी डोळ्यांची तपासणी करून घेतली. या शिबिरात १६ रुग्णांना मोतिबिंदू झाल्याचे निदर्शनास आले. या सर्व रुग्णांवर ११ एप्रिल रोजी शालिनीताई मेघे रुग्णालय वानाडोंगरी येथे निशुल्क शस्त्रक्रिया करण्यात यईल. येण्याजाण्याचा, राहण्याचा व जेवणाचा खर्चही निःशुल्क राहील. शालिनीताई मेघे रुग्णालय येथील डॉ. निश्चल राऊत, डॉ. पल्लवी धामले, डॉ. संतोषी शेंदूरकर यांनी सेवा दिली. हे शिबीर यशस्वी करण्यासाठी उपसरपंच अनुप नागपुरे, ग्रामसेविका संगीता भोले, प्रफुल्ल उइके,विनोद आत्राम, समता फाऊंडेशनचे संदीप हेडाऊ व कर्मयोगी फाऊंडेशनच्या सदस्यांनी मोठ्या प्रमाणात यशस्वी मेहनत घेतली.butibori midc