बुटीबोरी,. गोंडवाना परिसरातील मांडवा स्थित 99 बटालियन बीएसएफच्या दलाचा 53 वा वर्धापन दिननी कोर सीमा सुरक्षा दलाचे कमांडंट संजीव कुमार यांच्या निर्देशानुसार डेप्युटी कमांडंट कमलेश कुमार,

असिस्टंट कमांडंट डॉ. अंकुश रावल यांच्या मार्गदर्शनात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या औचित्याने रक्तदान शिबीर घेण्यात आले. यात एकुण 27 जणांनी रक्तदान करुन आपली सामाजिक बांधिलकी जपली.
याप्रसंगी बुटीबोरीचे माजी नगराध्यक्ष बबलू गौतम, आयपीएस दीपक अग्रवाल, बुटीबोरीचे पोलिस निरीक्षक सतिशसिंग राजपूत, सामाजिक कार्यकर्ते आतिष उमरे, होरीबा कंपनीचे प्लांट हेड अजय सागवान,

कुणाल रामटेके, जयवीर सिंग आदी प्रामुख्याने उपस्थित होते .