मवेशी तस्करी में 2 युवक पकड़ाए ₹9.60 लाख का माल जब्त किया

बुटीबोरी: गोवंशाची अवैध वाहतूक करणाऱ्या दोन आरोपींना पोलिसांनी गजाआड केले. विनोद हरिचंद्र खेडकर (३२, रा. भूगाव, ता. कामठी) व निखिल कैलास बनकर २५, रा. किनी, ता. कुही) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

एमआयडीसी बुटीबोरी पोलिसांना पेट्रोलिंगदरम्यान नागपूर वर्धा रोड काठेवाडी डावासमोर विनानंबरची बोलेरो पिकअप क्रमांक एमएच ४० / सीएम ०५९५ आढळून आली. वाहनात सहा जनावरे आढळली. पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातून एकूण नऊ लाख रुपयांचा ऐवज जप्त केला.

गुन्हा दाखल करून अटक केली. ही कारवाई नागपूर ग्रामीणचे साहाय्यक पोलीस अधीक्षक विशाल आनंद, नागपूर विभागाच्या उपविभागीय पोलीस अधिकारी पूजा गायकवाड यांच्या मार्गदर्शनात एमआयडीसी बुटीबोरी पोलीस स्टेशनचे पोनि. महादेव आचरेकर, पोउपनि शिवाजी भताने, पोना. विनायक सातव, श्रीकांत गौरकार, पोशि. राजू पोले, विकास ठाकरे, निखिल शेगावकर यांनी केली

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *