बुटीबोरी -“१मे” महाराष्ट्र दिन तथा कामगार दिन निमित्ताने दि १मे सकाळी 07:00 वाजता मोरारजी टेक्सटाईल लि,
बुटीबोरी येथे आपले मार्गदर्शक श्री तुषार डेरकर यांच्या हस्ते ध्वज फडकविण्यात आला असून ध्वजारोहणाचा कार्यक्रम आनंदात पार पडला.
या कार्यक्रमाला जवळजवळ 200 कामगार हजर असून तुषार यांनी सर्व कामगार मित्रांना मार्गदर्शन केले तसेच आपल्या कामगारांच्या हक्का करिता सुरू असलेल्या कामबंद संप बाबत कामगारांना संबोधित केले.प्रसाद,नास्ता ,चहा वाटप करून आनंदात कार्यक्रम पार पडला.