क्षत्रिय राजपूत संघटना तर्फे बुटीबोरीत महाराणा प्रताप जयंती मोठ्या उत्साहात साजरी , आरोग्य रोग निदान शिबिराचे आयोज , शेकडो रुग्णांनी घेतला शिबिराचा लाभ

बुटीबोरी (नितीन कुरई ) – २९ मे,गुरुवार रोजी क्षत्रिय राजपूत संघटना बूटीबोरी तर्फे शूरवीर महाराणा प्रताप सिंह यांची जयंती मोठ्या उत्साहाने आणि भक्तिभावाने साजरी करण्यात आली.या निमित्ताने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले,ज्यात सांस्कृतिक,सामाजिक व धार्मिक विधीचा समावेश होता.
सकाळी ११ वाजताच्या सुमारास बुटीबोरी येथील महाराणा प्रताप चौकात त्यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले.या प्रसंगी बुटीबोरीतील शेकडो नागरिक उपस्थित होते. संपूर्ण बूटीबोरीमध्ये सर्वत्र महाराणा प्रताप यांच्या जयंतीचा उत्साह आणि आनंद जाणवला.नागरिकांनी एकत्र येऊन या वीर योद्ध्याला आदराने आणि प्रेमपूर्वक स्मरण केले तसेच अनेक भाविकांनी महाराणा प्रताप यांच्या प्रति आपल्या भावना व्यक्त केल्या.
जयंतीनिमित्त बुटीबोरी येथील दुर्गा मंदिरात भव्य आरोग्य रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिरात परिसरातील अनेक नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.सामाजिक बांधिलकी जपत आयोजकांनी हे शिबिर राबविले असून,उपस्थित नागरिकांनीही उपक्रमाचे कौतुक केले.
या कार्यक्रमामुळे युवकांमध्ये समाजकार्याची जाणीव वाढली असून महाराणा प्रताप यांच्या शौर्याचे स्मरण करत समाज उपयोगी उपक्रम राबविण्यात आला.
** महाराणा प्रताप हे केवळ एक शासक नव्हते,तर ते एक प्रेरणास्त्रोत आहे.त्यांच्या शौर्याची आणि पराक्रमाची आठवण म्हणून ही जयंती साजरी केली जाते.बूटीबोरीतील महाराणा प्रताप जयंती एक अविस्मरणीय अनुभव आहे.ज्यामुळे महाराणा प्रताप यांच्या कार्याची माहिती जनसामान्यात पोहचविणे हा एकमेव उद्देश आहे.
***क्षत्रिय राजपूत संघटना बुटीबोरी