टाकलघाट, दि. २० मे २०२५ — येथील एस. आर. कराटे अॅण्ड किकबॉक्सिंग क्लबचे विद्यार्थी आगामी २५ ते २६ मे २०२५ रोजी नेपाळ येथे होणाऱ्या इंटरनॅशनल कराटे टूर्नामेंटमध्ये सहभागी होणार आहेत. या स्पर्धेसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना कराटे खेळासाठी आवश्यक साहित्य (किट) आणि आर्थिक मदतीचे वाटप आज मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

या प्रसंगी मा. श्री. हरीशचंद्र अवचट (मा. जिल्हा परिषद सदस्य), मा. श्री. उमेश कावळे (उपसरपंच, ग्रामपंचायत टाकलघाट), मा. श्री. चंद्रशेखर कावळे (सदस्य, ग्रामपंचायत टाकलघाट), मा. श्री. निरज भोयर (समाजसेवक), श्री. दिगंबर कटरे (समाजसेवक), बावणे सर व गायकवाड सर (निस्ताने स्कूल, टाकलघाट) आणि अनु नायक मॅडम (डिवाइन स्कूल) यांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे आयोजन एस. आर. कराटेचे संस्थापक आणि महाराष्ट्र सेक्रेटरी सेन्साई सुधीर रिनके सर यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते. त्यांनी आपल्या भाषणात सर्व मान्यवरांचे आभार मानले आणि विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढला असून, त्यांच्या यशासाठी संपूर्ण गावकऱ्यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.